मटाणे गावाविषयी माहिती :-
मौजे मटाणे गाव देवळा - कळवण रस्त्यालगत वसलेले आहे . गावी ८०% कुटुंबे मळ्यात राहतात . थोडक्यात गावी ८०% कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत . २० % कुटुंबे गावात राहतात .तालुका मुख्यालयाच्या पच्छिम दिशेला वसलेले मटाणे हे गाव तालुका मुख्यालयापासून ०३ कि.मी. अंतरावर आहे. गावाच्या पूर्वेस देवळा पश्चिमेस वरवंडी दक्षिणेस वाजगाव व उत्तरेस झिरेपिंपळ गाव वसलेले आहे.गावचे एकुण भौगोलिक क्षेत्र ६३६ हे. ५९ आर एवढे आहे. तसेच गावठाण क्षेत्र २ हे. ३० आर आहे.गावची एकुण लोकसंख्या सन १९११ च्या जनगणनेनुसार १९२६ असून पैकी पुरुष १०१२ व ९१४ महिला आहेत .गावातील एकुण लोक संख्येपैकी ५३५ अनुसूचित जातीतील व १६८ अनुसूचित जमातीतील लोकसंख्या आहे. गावात व मळ्यातील असे एकुण ३६९ कुटुंबे असून दारिद्र्य रेषेखालील ५० कुटुंबे आहेत.
गावात जि.प. परिषद शाळा- २ , माध्यमिक शाळा-१ व अंगणवाडी केंद्र-३ आहेत . तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे . व गावात महिला बचत गट आहेत .
तसेच गावात दरवर्षी मोठ्या उत्साहाने अखंड हरीनाम सप्ताह कार्यक्रम करतात . गावात हनुमान मंदिर , श्रीराम मंदिर, पीर साई बाबा , दत्त मंदिर, म्हसोबा मंदिर व वेडूका माता मंदिर हे गावातील प्रसिद्ध देवस्थान आहे. गावात ग्रामपंचायत कार्यालय समोर सभामंडप आहे, तसेच आंबेडकर नगर वस्तीत समाजमंदिर आहे.